७/१२ उताऱ्यात फेरफार करून लाखो शेतकऱ्यांची फसवणूक; १५२ महसूल अधिकारी चौकशीत दोषी
महाराष्ट्रातील महसूल विभागातील इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा? महाराष्ट्रात जमीन नोंदींशी संबंधित अत्यंत गंभीर असा घोटाळा उघड झाला असून, महसूल विभागाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा असू शकतो, अशी कबुली स्वतः राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या ७/१२ उताऱ्यात फेरफार करण्यात आल्याचे समोर आले…
